अध्यक्ष मनोगत

ठाणे महानगरपालिका  जेष्ठ  नगरसेविका सौ. अनिताताई बिर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली मी  स्वत साईनाथ करगुटकर, संतोष रुमडे, दिलीप सावंत व बाळा घारे असे चौघेजण मिळुन भंडारी मंडळ स्थापन करण्याचे ठरले. नवी शाळा, नवी पाटी या उद्देशाने नविन मंडळ स्थापन करायचे निश्चित केले. त्यानुसार आम्ही लोकमान्य नगर, सावरकर नगर, वर्तक नगर येथील आपल्या भंडारी कुटुंबियांचा अंदाज घेऊन जवळ जवळ तीनशे कुटुंबांची नावे व पत्त्यांची त्वरीत नोंद केली. अशा प्रकारे भंडारी समाज  संस्था , ठाणे मोठ्या  दिमाखात स्थापन झाली. अध्यक्ष – श्री. प्रविण कामत, उपाध्यक्ष – श्री. कृष्णाजी ढवळ, सहसचिव – श्री. खोत आणि समिती सदस्य – श्री संतोष रुमड व दिलीप सावंत समिती स्थापन झाली. पण प्रश्न होता 1500/- रुपयांचा. 1998 साली चौघांनी रु 400/- जमा केले होते, त्यात 1100/- रुपयांची भर घालुन संस्था रजिस्टर करायची होती. तेव्हा माझ्या  सौभाग्यवतीकडुन तिने घरखर्चातून बचत केलेले 1100/- दिले आणि “भंडारी समाज  संस्था, ठाणे” खऱया अर्थाने, विधीपूर्वक  उद्यास आली. सभासद शुल्कासाठी  घरोघरी फिरताना आम्हांला  बरे – वाईट अनुभव आले तरीही आम्ही खचलो नाही. काही दिवसानंतर पदाधिकाऱयांची गळती सुरु झाली. उपस्थिती कमी होऊ लागली. अशावेळेस आम्हाला पुढे जाण्यास धीर देण्यासाठी श्री लवु नाईक यांनी मोलाची साथ दिली. त्याचप्रमाणे एका  वेगळ्याच स्तरावरील व्यक्ती  कै. सुरेश नागवेकर व कै. हरिश्चंद्र नागवेकर यांनी संस्थेला तसेच मलासुद्धा बरीच मदत व मौलीक सहकार्य दिले. त्याचप्रमाणे माझे सहकारी श्री. प्रविण कामत, श्री. बाळा राठिवडेकर यांची मदत होती. विशेषत श्री. कृष्णाजी ढवळ  यांनी आपल्या महाविद्यालयातील  वर्ग, सभा घेण्यासाठी मोफत उपलब्ध करुन दिले. त्याचप्रमाणे सर्वश्री  श्री. विजयानंद करगुटकर , प्रशांत हडकर, संतोष रुमडे, बाळा घारे इ. चे सहकार्य महत्त्वाचे आहे. मी श्री. नरेंद्र मांजरेकर यांचे नाव प्रकर्षाने घेईन, कारण सर्व प्रथम रुपये 1000/- एवढी रक्कम स्टेशनरीसाठी  दिली. त्यातुनच लेटर हेड, रिसीट बुक, व इतर स्टेशनरी घेतली गेली  व  कागदोपत्री कार्याला सुरुवात झाली . मनोगताच्या  शेवटी एवढीच कळकळीची विनंती आहे की, गेल्या 13 वर्षातील सर्व माजी- आजी पदाधिकारी, आज जे माझ्या बरोबर आहेत, आणि जे नाहीत पण समाजासाठी काही करु इच्छिणारे, तसेच सभासद, हितचिंतक, देणगीदार, आश्रयदाते या सर्वाच्या मौलिक सहकार्याने आपल्या भंडारी समाजासाठी  स्वतची, हक्काची वास्तु उभी करावयाची आहे.ठाण्यात भंडारी भवनाचे स्वप्न तुम्हा सर्वाच्या सहकार्यानी पुर्ण होईल. तुमचे आर्शिवाद  व शुभेच्छा पाठीशी राहोत हीच अपेक्षा.

आपला

श्री. साईनाथ करगुटकर

संस्थेचे कार्यक्रम

 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1

संस्थापक सदस्य

श्री. साईनाथ धोंडू  करगुटकर
श्री. संतोष कृष्णा रुमडे
श्री. दिलीप मोतीराम  सावंत
श्री. भालचंद्र मनोहर घारे
श्री. प्रविण दत्ताराम कामत
श्री. हेमचंद्र विठ्ठल राठीवडेकर
श्री. कृष्णाजी भिकाजी ढवळ

वार्षिक कायर्क्रम

 • आरोग्य शिबीर, हळदीकुंकू
 • गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
 • जेष्ठ नागरिक सत्कार
 • पुरस्कार प्राप्त व्यक्तीचा समाज्याच्या वतीने सत्कार
 • वार्षिक स्नेहसंमेलन
 • वधूवर मेळावा
 • सभासदांची वार्षिक कौटुंबिक सहल