• 2slider1

 • slider2
 • slider3

भंडारी समाज ठाणे

 

भंडारी समाज  ठाणे - या संस्थेची माहीती  देताना  आनंद होत आहे. गेल्या 13  वर्षात संस्थेचे लहान रोपट्यातून एका मोठ्या वृक्षात रुपांतर होत आहे. याचे सर्व श्रेय आपल्या सारखे आमचे सर्व ज्ञाती बांधव, देणगीदार, जाहीरातदार सल्लागार, जेष्ठ नागरीक यांनाच आहे. आपल्या सर्वांच्या  आर्शिवादानेच आम्ही हा संस्थेचा रथ पुढे नेत आहोत.

संस्थेतर्फे ज्ञाती बांधवांसाठी मेळावे घेणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, शैक्षणिक उपक्रम राबविणे, आरोग्य शिबीर भरविणे,स्त्रियांकरीता  हळदीकुंक समारंभ तसेच समाजासाठी सांस्कृतिक मेळावे घेणे या सारखे उपक्रम संस्था समाजबांधवांसाठी राबवित असते. या मागचा  संस्थेचा मुळ उद्देश हाच आहे की, समाजातीब सर्व भंडारी ज्ञाती  बांधवांनी एकत्रितपणे  येऊन आपल्या आचारविचाराची देवाणघेवाण करावी. गरजू समाज  बांधवांना आपण मदतीचा हात  द्यावा तसेच समाजाचा सर्वागित विकास  व्हावा.

संस्था सातत्याने दर रविवार, आणि मंगळवार आपल्या समाजातील ज्ञाती बांधवाकरीता  भंडारी वधू – वर सुचक मंडळातर्फे नोंदणी करुन समाजातील मुलां-मुलींच्या  लग्नाकरिता योग्य ते स्थळ मिळावे या करिता प्रामाणिक प्रयत्न करित असते. तरी आपण  सर्व सभासदांनी आपल्या पासुन दूर असलेले आपले नातेवाईक ज्ञाती बांधव जवळ  येतील हीच सदिच्छा !

आपणास कळविण्यात आनंद  होतो की , आपल्या संस्थेने  आपल्या  शिरपेचात एक मानाचा तूरा रोवला तो म्हणजे भंडारी समाज संस्थेने आपल्या संस्थेचे संकेत स्थळ  www.bhandarisamaj.com  3 सप्टेंबर 2013 रोजी प्रसारीत केले आहे. जेणे करुन आपल्या भंडारी समाजातील, शैक्षणिक, व्यवसायविषयक, इत्यादी माहीती सर्व जगामध्ये  उपलब्ध होईल. तसेच समाजातील वधु-वरांना त्यांच्या  योग्यतेप्रमाणे संस्थेच्या संकेत स्थळावर त्यांच्या मनाजोगता योग्य तो जोडीदार निवडण्यास मदत होईल. भंडारी समाज  संस्थेच्या संकेत स्थळावर आपली माहीती नेंदणी करीता संस्थेच्या ऑफिसमध्ये फॉम उपलब्ध आहेत. त्याकरीता आपण संस्थेच्या नियमाप्रमाणे आपली  नोंदणी करावी.

भंडारी  समाजाच्या उन्नतीसाठी आपले सहकार्य, मार्गदर्शन, बहुमूल्य आहे.

 

  

 

 संपर्क : 9969385162,   9820482510,    9930678349,   9892038591,   9920114405

 वधु-वर नोंदणी समाजाच्या ऑफिसमध्ये सुरु आहे.

 वेळ :  मंगळवार,संध्या ०५ ते :०८आणि  रविवार सकाळी १० ते ०१:०० 

नवीन पत्ता : ऑफिस नं.३३ १ मजला जय हिंद सोसायटी महात्मा फुले रोड खारटन रोड  ठाणे पश्चिम ४००६०१.

 

 

  संपर्कस्थळावर जाहिरातीसाठी भंडारी समाज संस्थेशी संपर्क साधावा.

 Email :-  This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

 

 

 

 

 

 

 

संस्थेचे कार्यक्रम

 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1

संस्थापक सदस्य

श्री. साईनाथ धोंडू  करगुटकर
श्री. संतोष कृष्णा रुमडे
श्री. दिलीप मोतीराम  सावंत
श्री. भालचंद्र मनोहर घारे
श्री. प्रविण दत्ताराम कामत
श्री. हेमचंद्र विठ्ठल राठीवडेकर
श्री. कृष्णाजी भिकाजी ढवळ

वार्षिक कायर्क्रम

 • आरोग्य शिबीर, हळदीकुंकू
 • गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
 • जेष्ठ नागरिक सत्कार
 • पुरस्कार प्राप्त व्यक्तीचा समाज्याच्या वतीने सत्कार
 • वार्षिक स्नेहसंमेलन
 • वधूवर मेळावा
 • सभासदांची वार्षिक कौटुंबिक सहल